- 03/01/2024
- Livwell Happier Minds
- Blog
What Is Dementia?
डिमेंशिया काय आहे_What is Dementia ?
डिमेंशिया/Dementia हा शब्द ‘De’ म्हणजे Without आणि ‘Mentia’ म्हणजे Mind अशा दोन अर्थपूर्ण शब्दांनी तयार झालेला आहे. अधिकतर लोक डिमेंशिया ही छोट्या-छोट्या गोष्टी विसरण्याच्या समस्या आहे असे मानतात. परंतु गोष्टी विसरणे किंवा स्मृतीभ्रंश होणे हेच या मानसिक स्थितीचे लक्षण नसून त्यामध्ये अजून गुंतागुंत असल्याचे तज्ञ सांगतात.
डिमेन्शिया आजाराचे टप्पे : ( Stages of Dementia )
- सुरुवातीची अवस्था : व्यक्ती गोंधळलेली भासते आणि नुकत्याच घडलेल्या गोष्टी विसरू शकते. एकटक एका जागेवर लक्ष एकाग्र करणे, निर्णय घेणे अवघड होऊ लागते. रोजच्या आयुष्यात उत्साह वाटेनासा होईल. बहुसंख्य कुटुंबीयांना आणि आरोग्यसेवकांनादेखील, म्हातारे होण्यातली ही ‘नॉर्मल’ स्थिती वाटेल.
- मधली अवस्था: गोंधळलेली मनाची अवस्था , विस्मरण आणि मूड्समधले बदल अधिक तीव्र व्हायला लागतात. रागीट , आक्रमक आणि अनुचित लैंगिक वर्तन यांसारख्या वर्तन समस्या कदाचित निर्माण होतील. वयस्कर व्यक्ती घराबाहेर पडून इकडेतिकडे भटकायला लागू शकते. तिची झोप खूपच बिघडून जाऊ शकते किंवा झोपच लागणार नाही आणि स्वतःची स्वतः काळजी घेण्याची तिची क्षमता कमी होऊ शकते. ते हळूहळू परावलंबी होऊ लागतात जसे , कपडे घालण्यासारख्या साध्या गोष्टीदेखील तिला समजेनाशा होऊ शकतात, अशा व्यक्तीला बोलण्यामध्ये आणि अगदी रोजच्या संभाषणे समजण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.
- शेवटची अवस्था : व्यक्ती नातेवाईक किंवा मित्रांना ओळखू शकत नाही. तिचे वजन कमी होऊ शकते. तिला आकडी येऊ शकतात. मलमूत्रावरचे तिचे नियंत्रण जाऊ शकते. अशा व्यक्तीबरोबर काही अर्थपूर्ण संवाद अशक्य होऊन बसतो. ही व्यक्ती सारा वेळ गोंधळलेल्या मनोवस्थेत असू शकते.
डिमेंशियाची काही प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
कोणतीही गोष्ट सतत बोलणे, पुनरावृत्ती करणे. एखादी गोष्ट समजण्यामध्ये अडथळा निर्माण होणे.
- समाजामध्ये वावरताना विचित्र वागणे, लोकांशी नीट न बोलणे.
- असभ्य भाषेचा वापर करणे, शिव्या देणे, अश्र्लील कृती करणे.
- विनाकारण घाबरणे, दुसर्यांवर रागावणे, ओरडणे इ.
- पुढाकार घेण्यास संकोच करणे.
- सकाळी नाश्त्याला काय खाल्ले आहे हे लगेच विसरुन जाणे.
- लोकांची नावे लक्षात ठेवणे कठीण वाटते. छोट्या-छोट्या समस्यांवर समाधान शोधणे अशक्य वाटणे.
- एखादी गोष्ट कितीही प्रयत्न केला तरी न आठवणे, लक्षात ठेवता न येणे.
- विचार करायची शक्ती कमी होणे, सतत विचित्र वागणे.
- चालू दिवस, तारीख, महिना किंवा वर्ष विसरून जाणे.
म्हातारपणातील विस्मरण : हा आजार आहे असे कधी समजावे?
गोष्टी विसरणे किंवा वारंवार विस्मरण होत राहणे या गोष्टी आपण म्हातारपणाशी जोडतो. वय झाल्यामुळे आपल्या मानसिक क्षमता खरोखरच कमी व्हायला लागते पण याचा अर्थ असा नाही की आपण आपले नातेवाईक, आपण कुठे राहतो किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी विसरतो, वृद्धत्वातील सामान्य विस्मरणापेक्षा डिमेन्शियामधले विस्मरण खूपच टोकाचे असते म्हणजेच शेवटचे असते असे म्हणायला हरकत नाही म्हणून डिमेन्शिया झालेल्या व्यक्तीला त्याने काल काय केले किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची नावे किंवा तो राहत असलेल्या घराचा पत्ता वगैरे आठवणार नाही. आजार जसा बळावत जाईल [ वाढत जाईल ] तसे त्याला आज कोणता वार आहे किंवा वेळ किंवा तो काही मिनिटांपूर्वी काय म्हणाला हे बिलकूल आठवणार नाही. म्हणून तो परत परत त्याच गोष्टी बोलत राहील. कदाचित तो त्याच्या बायको-मुलांनादेखील ओळखणार नाही.
वयस्कर व्यक्ती अशा का वागू लागतात?
वयस्कर माणसे चमत्कारिक पद्धतीने वागण्याची चार प्रमुख कारणे आहेत : डिप्रेशन, वयस्कर माणसांमधल्या डिप्रेशनची सर्वसामान्य वैशिष्ट्ये म्हणजे दैनंदिन आयुष्यातून अंग काढून घेणे, भूक कमी होणे, झोप नीट न लागणे आणि शारीरिक तक्रारी. काही व्यक्ती आक्रमक होऊ शकतात तर काहींच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ शकतात.
- डेलिरियम किंवा गोंधळलेली मनाची अवस्था – डेलिरियमचे ओळखू येण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे तो एकदम तीव्र असतो. वागण्यामधील वेग्लेव्हीपणा हे काही दिवस आधीपासूनच सुरू झाले असणार. व्यक्ती रागीट होऊ शकते. काहींना भासही होऊ शकतात.
- सायकोसिस : तीव्र मानसिक आजारांमुळे मनात संशयी विचार निर्माण होऊ शकतात आणि भासही होऊ शकतात. डिमेन्शिया असणाऱ्या वय झालेल्या लोकांनादेखील सायकोसिस होण्याची शक्यता असते
- डिमेन्शिया : वयस्कर लोकांना, खासकरून ६५ वयाच्या पुढच्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता असते. या आजाराचे सर्वात आधी दिसणारे लक्षण म्हणजे विस्मरण, डिमेन्शिया आजारात मेंदू हळूहळू निकामी व्हायला लागतो. सध्या तरी या आजारावर कुठलाही इलाज नाही. या आजाराच्या रुग्णांची परिस्थिती हळूहळू खालावत जाते आणि ते काही वर्षेच जगू शकतात. डिमेन्शिया होण्याची सर्वसामान्य कारणे म्हणजे अल्झायमर्स आणि वेगवेगळ्या आजारांचे झटके.
डिमेन्शिया आजाराचा कुटुंबावर कसा परिणाम होतो?
बहुसंख्य कुटुंबांमध्ये वयस्कर लोकांना आदराने वागविले जाते. जेव्हा ही वयस्कर व्यक्ती वेगळ्या पद्धतीने वागायला लागते तेव्हा साहजिकच कुटुंबातील सगळ्यांना काळजी वाटायला लागते. अशी व्यक्ती सर्वात जवळच्या नातेवाईकाला विसरू शकते. आक्रमक , रागीट वागणं , गोंधळलेली मनाची अवस्था या वृद्ध व्यक्तीची काळजी घेणाऱ्या सर्वांनाच त्रास होतो. जसा आजार वाढतो तसे संबंधित व्यक्तीला स्वतःची देखभाल करणंही अशक्य होऊ लागते. काही दिवसांतच जेवणे, अंघोळ करणे, कपडे घालणे आणि शौचालयात जाणे ही सर्व दैनंदिन कामे दुसऱ्यांच्या मदतीशिवाय अशक्य होऊन बसते. आजाराच्या अंतिम टप्प्यात रुग्ण अंथरुणालाच खिळलेल्या अवस्थेत असतो व त्याला सतत मदतीची गरज असते. डिमेन्शिया पाच ते दहा वर्षांपर्यंत टिकू शकतो.
डिमेन्शिया हा बळावत जाणारा आणि कुठलाही इलाज नसलेला आजार आहे.महत्वाची लक्षणे असेल तेव्हाच डिमेन्शियाचे निदान पक्के करा. त्यासाठी पुढील माहिती वाचा
डिमेन्शिया आजाराचा कुटुंबावर कसा परिणाम होतो?
बहुसंख्य कुटुंबांमध्ये वयस्कर लोकांना आदराने वागविले जाते. जेव्हा ही वयस्कर व्यक्ती वेगळ्या पद्धतीने वागायला लागते तेव्हा साहजिकच कुटुंबातील सगळ्यांना काळजी वाटायला लागते. अशी व्यक्ती सर्वात जवळच्या नातेवाईकाला विसरू शकते. आक्रमक , रागीट वागणं , गोंधळलेली मनाची अवस्था या वृद्ध व्यक्तीची काळजी घेणाऱ्या सर्वांनाच त्रास होतो. जसा आजार वाढतो तसे संबंधित व्यक्तीला स्वतःची देखभाल करणंही अशक्य होऊ लागते. काही दिवसांतच जेवणे, अंघोळ करणे, कपडे घालणे आणि शौचालयात जाणे ही सर्व दैनंदिन कामे दुसऱ्यांच्या मदतीशिवाय अशक्य होऊन बसते. आजाराच्या अंतिम टप्प्यात रुग्ण अंथरुणालाच खिळलेल्या अवस्थेत असतो व त्याला सतत मदतीची गरज असते. डिमेन्शिया पाच ते दहा वर्षांपर्यंत टिकू शकतो.
डिमेन्शिया हा बळावत जाणारा आणि कुठलाही इलाज नसलेला आजार आहे.महत्वाची लक्षणे असेल तेव्हाच डिमेन्शियाचे निदान पक्के करा. त्यासाठी पुढील माहिती वाचा
कुटुंबीयांना किंवा मित्रपरिवाराला विचारण्याचे प्रश्न:
काहीतरी गडबड आहे असे तुम्हाला सर्वात आधी कधी वाटले? मदत घेण्याच्या खूप आधी जाणवलेली काही लक्षणे एखाद्या नातेवाईकाला आठवू शकतात.
- आजारपणाला सुरुवात कशी झाली? या वयस्कर व्यक्तीला नावे किंवा तारीख-वार आठवण्यामध्ये अडचण येत होती का? डिमेन्शिया आजाराचे महत्त्वपूर्ण लक्षण आहे-विस्मरण. पण हे डिप्रेशनमध्येही घडू शकते.
- जेवणे, अंघोळ करणे अशा दैनंदिन कामांमध्ये या व्यक्तीला काही अडचण येते का? जर येत असेल तर मग डिमेन्शियाची शक्यता तपासून पाहिली पाहिजे.
- या व्यक्तीच्या वर्तनात तुम्हाला काही खटकते का? उदा., आक्रमक होणे, प्रक्षुब्ध होणे वगैरे. ही लक्षणे देखील विशेषकरून डिमेन्शियाची आहेत.
- ही व्यक्ती उदास आहे का? ‘तिला जीवनात रस वाटेनासा झाला आहे’ असे तुम्हाला वाटते का? ही डिप्रेशनची वैशिष्ट्ये आहेत पण ती डिमेन्शियामध्येही आढळतात.
विकसनशील देशांमधला डिमेन्शिया आजार महत्त्वाचा का?
डिमेन्शिया होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे अल्झायमर्स आजार. हे नाव युरोपातील विकसित देशांमध्ये, उत्तर अमेरिका आणि जपानमध्ये खूपच परिचित आहे. का? कारण या देशात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वयस्कर लोक आहेत. पण विकसनशील देशात आजपर्यंत वयस्कर लोकांची संख्या युरोप-अमेरिकेच्या तुलनेने खूपच कमी होती. आता ही परिस्थिती बदलते आहे. जन्मदराचे प्रमाण कमी होते आहे. माणसे आता अधिक काळ जगणार आहेत. त्यामुळे भविष्यकाळात विकसनशील देशातही डिमेन्शिया ही एक मोठी समस्या बनणार आहे. विकसित देशात अशा वयस्कर लोकांची काळजी आणि देखभाल करण्यासाठी सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण झालेली आहे. पण विकसनशील देशात अशी यंत्रणा नाही. बहुतांश विकसनशील देशात या आजाराबद्दल फारशी जागृती नाही. साहजिकच सुविधा आणि यंत्रणाही जवळजवळ नाहीतच. म्हणून विकसनशील देशातील आरोग्यसेवकांसाठी डिमेन्शिया हा आजार एक मोठे आव्हान आहे.
Livwell Happier Clinic क्लिनिक मध्ये या मानसिक आजारावर निदान आणि उपचार कसे केले जातात ?
डिमेंशिया (स्मृतिभ्रंश) वर उपचार करण्यासाठी पुणे , हिंजवडीवाडी मधील Livwell Happier Clinic क्लिनिक मध्ये Dr. Pratibha ह्या सर्वात प्रथम रुग्णाचा वैद्यकीय इतिहास जाणून घेतला जातो आणि त्याचबरोबर रुग्णाची शारीरिक तपासणी केली जाते. आकलनविषयक कार्याचे मूल्यांकन या दरम्यान केले जाते, परंतु अतिरिक्त केस नुसार काही चाचण्या देखील आवश्यक असू शकतात.आकलनविषयक कार्याचे मूल्यांकन करण्यासाठी मिनी-मेंटल स्टेट एक्झामिनेशन (एमएमएसई) सर्वात व्यापक प्रमाणात वापरली जाणारी चाचणी आहे.
पुढील तपासणी आवश्यक असल्यास, हे समाविष्ट असू शकतातः
• रक्त तपासणी.
• मेंदूचा एमआरआय किंवा सीटी स्कॅन.
• ईईजी (इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम).
योग्य त्या औषधोपचार केला जातो , त्याचा प्रतिसाद किती मिळतो ह्याचा आढावा घेतला जातो.